करमाळा प्रतिनिधी

श्रीकमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपाततील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे.  श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.

आज मंगळवार दिनांक २५/०२/२०२५ रोजी रोख देणगी रु.३१,१११/- (रूपये एकतीस हजार एकशे अकरा फक्त) तानाजी महामुनी महामुनी ज्वेलर्स रा. करमाळा. यांचे कडून देणगी प्राप्त झाली आहे. यानिमित्त त्यांचा सत्कार मंदिर समितीचे विश्वस्त सुशील राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंदिर पुजारी रोहित पुजारी, तुषार सोरटे, सहदेव सोरटे, पुरोहित सुशील पुराणिक, अशोक गाठे,  पद्माकर सूर्यपुजारी, सेवेकरी मानकरी व भक्तगण तसेच महामुनी परिवार उपस्थित होते.

श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.

तसेच ऑनलाईन देणगी ची सुविधा उपलब्ध आहे.संपर्क अशोक गाठे व्यवस्थापक मो नं ९४०४७०८९२४.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *