करमाळा प्रतिनिधी

शेलगाव वांगी तालुका करमाळा येथे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त अष्टविनायक मित्र मंडळ शेलगाव वांगी व जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन दिनांक 23 रोजी 9 ते 2 वाजेपर्यंत करण्यात आले होते. सदर शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून

एकूण 760  लोकांनी याचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये रुग्णांची मोफत रक्त तपासणी व ईसीजी व मोफत औषधे वाटप करण्यात आले यातील गरजू रुग्णांना पुढील मोफत उपचारासाठी जगदाळे जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी संदर्भित करण्यात आले. या मोफत शिबिरामध्ये डॉ. संदीप पाटील M D बालरोगतज्ञ डॉ. राहुल बनसोडे, डॉ. धनंजय वावरे, रविराज कुंभार,

डॉ.सारंग बोरकुटे, डॉ.पल्लवी पाटील, डॉ. महेश देवकते, डॉ. गणेश वैद्य, डॉ. सचिन करळे, डॉ. वैभव मोराळे, डॉ. शिवाजी साडेकर, डॉ. वैशाली लोकरे, डॉ.पांडुरंग लोकरे बार्शी डॉ.शिंदे करमाळा व डॉ. टोपे वैद्यकीय अधिकारी जेऊर यांनी मोफत सेवा दिले. या शिबिराचे उद्घाटन करमाळाचे नायब तहसीलदार गायकवाड, डांगे, शेलगाव चे सरपंच अमर दादा ठोंबरे, महादेव अण्णा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वैभव पाटील, भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पोटे, जिल्हा सरचिटणीस नागनाथ केकान, गणेश केकान, रमेश चव्हाण, बाळू पोटे, संतोष केकान व सर्व अष्टविनायक मंडळातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *