
करमाळा प्रतिनिधी
पांगरे ता. करमाळा येथील शितल सुनिल वाघमारे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक पदी निवड झाली. याबद्दल पांगरे गावातील माजी उपसरपंच चंद्रकांत आबा पाटील, आदिनाथ सहकारी

साखर कारखाना लि. आदिनाथ नगरचे माजी प्रशासकीय संचालक संजय भाऊ गुटाळ, प्रगतशील बागायतदार भारत नाना टेकाळे, वि.का.सो.संचालक गहिनीनाथ राजे गुंजाळ, आमदार गटाचे नेते पिंटूदादा पाटील इत्यादी ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले.

शितलचे सर्व शिक्षण नु.म.वि.मुलीची शाळा पुणे येथे झाले. सातत्य, परिश्रम व योग्य नियोजन यामुळे यश प्राप्त झाले याबद्दल शितलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.