
करमाळा प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी भव्य उद्योग प्रदर्शन आयोजन केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार युवा सेना जिल्हा समन्वयक व या प्रदर्शनाचे आयोजक निखिल चांदगुडे यांनी केला.

यावेळी कृषी उत्पन्न समितीचे मा. सभापती शिवाजी बंडगर, यशकल्याणी संस्थेचे प्रा. गणेश करे-पाटील, भाजपचे अध्यक्ष जगदीश अगरवाल, मकाईचे संचालक सतीश नीळ, सा. कमलाई नगरीचे संपादक जयंत दळवी, अँड प्रियाल अगरवाल, नाना करंडे, विकी शिंदे, शिवसेना पदाधिकारी मान्यवर, चांदगुडे परीवार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमामध्ये खास महिलांसाठी करमाळ्यातील नामांकित डेव्हलपर्स तर्फे प्लॉट खरेदी व घर खरेदी वर आकर्षक सूट व गिफ्ट मिळाले व जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घेतला. सरकार तर्फे महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती यावेळी महिलांना देण्यात आली. यावेळी विविध महिलांनी आपले स्टॉल लावले होते.