
करमाळा प्रतिनिधी
बस स्थानक परिसर दैनंदिन स्वच्छता करून परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. राज्य परिवहन महामंडळाने दखल घेऊन बस स्थानक स्वच्छतेसाठी नेमलेल्या एजन्सीला परिसरातील स्वच्छता राखण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. बस स्थानक

परिसर दुर्गंधीमुक्त होण्यासाठी दैनंदिन स्वच्छता होणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सेवेकरिता विभागीय स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. स्वच्छतेबाबत वेळोवेळी स्वच्छता एजन्सीला कळविण्यात यावे जेणेकरून परिसर दुर्गंधीमुक्त

होण्यासाठी मदत होईल. तरी आपण प्रवाशांच्या सोयीसाठी हा मुद्दा महत्त्वाचा असून त्यावर गांभीर्याने विचार करण्यात यावा ही विनंती. असे घारगावच्या माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी सरवदे यांनी म्हटले आहे असे पत्र आगार व्यवस्थापक यांना पाठवण्यात आले आहे.