करमाळा प्रतिनिधी

संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात जवळपास 20 कोटी रुपयांचा विकास निधी करमाळ्यात आला असून गेली 25 वर्षापासून प्रलंबित असलेला करमाळा एमआयडीसी चा प्रश्न मार्गी लागला आहे. आता लवकरच नव तरुणांसाठी उद्योगासाठी एमआयडीसी प्लॉट उपलब्ध होतील. अँड. कमलाकर वीर यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष निधीतून करमाळा शहरात आधुनिक व्यायाम शाळेसाठी 44 लाख रुपये मंजूर झाला असून या इमारतीची भूमिपूजन आज अँड. वीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुकाप्रमुख अनिल पाटील, उपतालुकाप्रमुख डॉ. गौतम रोडे, बाळासाहेब वाघ, शहर प्रमुख संजय शीलवंत, माजी तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख नागेश चेंडगे, महिला आघाडी शहर प्रमुख कीर्ती स्वामी, भाजप शहरप्रमुख जगदीश अग्रवाल, ठेकेदार विश्वासराव काळे, सचिन गांधी, दिग्विजय देशमुख, भरत कांबळे, प्रवीण गायकवाड, विकास डाळे, रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण, बाबा तोरणे, जेऊर शाखाप्रमुख संजय जगताप आदी जण उपस्थित होते.

यावेळी बोलताना अँड. कमलाकर वीर म्हणाले की, मंगेश चिवटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. यांच्या माध्यमातून वैद्यकीय निधी मधून करमाळा तालुक्यातील अनेक रुग्णाला मदत झाली आहे. जेऊर बस स्थानक, करमाळा बस स्थानक या दोन्ही बस स्थानकाला निधी मंजूर झाला आहे. विद्यार्थिनींसाठी धर्मवीर आनंद दिघे अभ्यासिका मंजूर झाली असून यातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. या इमारतीसाठी 45 लाख रुपये मंजूर झाले आहेत. मांगी रोडवरील शासकीय एमआयडीसीमध्ये उद्योजकांना तात्पुरता पाणीपुरवठा करण्यासाठी साडेचार कोटी रुपयांची योजना मंजूर झाली असून येत्या आठवड्यात याचे भूमिपूजन होणार असून पाच गुंठ्याचे 90 प्लॉट उद्योजकांना वाटपाची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *