प्रशासनाने अत्यंत पारदर्शकपणे प्रक्रिया राबवून 318 उमेदवारांची निवड केली
सोलापूर दि.09(जिमाका):- जिल्ह्यातील एकूण 330 रिक्त आपले सरकार सेवा केंद्रासाठी 2 हजार 998 अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले. प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र व अपात्र उमेदवारांची/केंद्राची अंतिम निवड यादी दि. 03 डिसेंबर 2024 रोजी तयार करणेत आली असून, सदर यादी https://solapur.gov.in या वेबसाईटवर पाहण्यास उपलब्ध आहे. यात प्रशासनाने अत्यंत पारर्शकपणे प्रक्रिया राबवून मेरिट वर 318 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे.
माहिती व तंत्रज्ञान (साप्रवि) यांचेकडील शासन निर्णय नुसार आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्रशासनाच्या सीएससी 2.0 अंतर्गत मार्गदर्शक सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील एकूण 330 रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची यादी दि. 26 जुलै 2024 रोजी प्रसिध्द करणेत आली असून दि. 12 ऑगस्ट ते दि. 30 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करणेची मुदत देणेत आली होती.त्यास अनुसरून आपले सरकार सेवा केंद्र मंजूरीकरिता एकूण 2 हजार 998 अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले. त्यामध्ये 2 हजार 409 उमेदवार पात्र ठरले असून 589 उमेदवार अपात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांच्या मधून एकूण 318 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. उर्वरीत आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज प्राप्त न होणे, अर्जदार स्थानिक नसल्याने सर्व उमेदवार अपात्र ठरणे प्राप्त होणे याबाबीमुळे सदरच्या केंद्राकरिता उमेदवारांची निवड करणेत आलेली नाही. तसेच 03 केंद्रांच्या उमेदवाराच्या बाबतीत तक्रार अर्ज प्राप्त झाल्याने त्याबाबत सुनावणी अंती निर्णय घेणेत येईल.
आपले सरकार सेवा केंद्रासाठी पुढील बाबीच्या आधारे पात्रता ठरविण्यात आली आहे.अर्जदार स्थानिक रहिवासी असावा. अर्जदार यांचे वय वर्ष 18 पूर्ण असावे, अर्जदार यांची किमान शैक्षणिक पात्रता 10 पास (एसएससी) असावी.पात्रतेनंतर आपले सरकार सेवा केंद्रासाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या गावाच्या भौगोलिक क्षेत्रातील सीएससी केंद्रधारकांना व संबंधित तालुक्यातील सीएससी केंद्रधारकांना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच त्यांच्या सीएससी केंद्रातून दिलेल्या सर्वाधिक व्यवहारांच्या संख्यानुसार निवड करण्यात आली आहे. या निकषाच्या आधारे निवड करण्यात आलेल्या केंद्रांची संख्या 250 इतकी आहे. एखाद्या गावासाठी सीएससी केंद्रधारकांचे अर्ज प्राप्त नसतील तर एकापेक्षा जास्त उमेदवार पात्र ठरत असल्यास त्याकरिता उच्चतम शैक्षणिक पात्रतेच्या आधारे निवड करण्यात आली आहे. या निकषाच्या आधारे निवड करण्यात आलेल्या केंद्रांची संख्या 35 आहे.पात्र उमेदारांमध्ये समान उच्चतम शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांच्यामध्ये वयाच्या ज्येष्ठतेनुसार पात्र उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. या निकषाच्या आधारे निवड करणेत आलेल्या केंद्रांची संख्या 33 आहे.
आपले सरकार सेवा केंद्राचा यापूर्वीचा 200 केंद्रांचा जाहिरनामा 2021 साली प्रसिध्द करण्यात आला होता. तदनंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रामणावर जुलै 2024 साली 330 केंद्राकरिता आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सदरची निवड प्रक्रीया ही जिल्हा प्रशासनामार्फत संपूर्ण पारदर्शकपणे व गुणवत्तेच्या निकषांच्या आधारे राबविणेत आली आहे. आपले सरकार सेवा केंद्रांबाबत पात्र व अपात्र आणि निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी / केंद्रांची यादी https://solapur.gov.in या वेबसाईटवर पाहण्यास उपलब्ध आहे.