करमाळा प्रतिनिधी
करमाळा, पांडे, फिसरे, सालसे रोडवरील खड्ड्यांमुळे अपघात होत आहे त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख अंकुशराव जाधव यांनी केली आहे.
हा रस्ता नुकताच केला आहे तरीही काही ठिकाणी खड्डे पडले आहे यामुळे इथे वारंवार अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वीच अपघात झाला आहे त्यात एका महिलेला दवाखान्यात ऍडमिट केले आहे. तसेच या परिसरात गतिरोधक असो वळणे असो या ठिकाणी सूचना फलक केले नाहीत ते सूचना फलक करावे, जिथे अपघाताची वळणे आहे तिथे पांढऱ्या पट्ट्यांनी कलर करावे
अशा अनेक समस्या या भागात आहे तरी करमाळा बांधकाम विभागाने त्वरित या भागातील ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्याची दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा करमाळा शिवसेना ओबीसी सेलचे शहर प्रमुख अंकुशराव जाधव यांनी दिला आहे.