करमाळा प्रतिनिधी

    नारायण आबा पाटील यांच्या माध्यमातून कुगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदाची ११ डिसेंबर २०१९ रोजी संधी मिळाल्यावर तिनही बाजूने ३० किलोमीटर पाण्याने वेढलेल्या कुगाव गावच्या दळणवळणाचा प्रश्न आमच्यासमोर होता. या गावातुन प्रवाशी वाहतूक पाण्यामार्गेच होते. कुगावला चार जलमार्ग मंजूर आहेत परंतु जलमार्गातील धोके लक्षात घेता आम्ही प्रथम पुलाची मागणी केली. कुगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभेत जोडपुलाचा ठराव मंजूर करुन शासन दरबारी कागदोपत्री पाठपुरावा चालु केला.

    कुगाव ता. करमाळा ते इंदापूर जोडपूलाचा विषय मार्गी लावण्यासंदर्भात सरपंच ग्रामपंचायत कुगाव पदी कार्यरत असताना पासूनच्या सातत्यपूर्ण केलेल्या सकारात्मक प्रयत्नास सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा इंदापूर चे कर्तव्यदक्ष आमदार दत्तात्रय मामा भरणे व मदनराव नाना देवकाते पाटील संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बॅंक लि. यांच्या माध्यमातून व सहकार्यातून यश मिळाले.

    कुगाव शिरसोडी जोडपुलाला अजितदादा पवार यांनी विधानसभेत ₹३९६ कोटी+ ला मंजुरी देऊन २३ ऑगस्ट २०२४ रोजी भुमीपूजन केले. मे T & T infra Ltd Pune च्या माध्यमातून पुलाचे काम प्रचंड वेगाने चालु आहे. सदर काम ९०० दिवसात काम पुर्ण करणेबाबत आदेश आहेत. सदर पुलामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा जोडला जाणार आहे.

तेजस्विनी दयानंद कोकरे (माजी सरपंच ग्रामपंचायत कुगाव ता. करमाळा)

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *