करमाळा प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आधुनिक व्यायामशाळा 44 लाख रुपये किमतीच्या इमारतीचे भूमिपूजन प्रसिद्ध विधीज्ञ अँड. कमलाकर वीर यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे. श्रावण नगर येथील ओपन स्पेस मध्ये ही इमारत उभी केली जाणार असून या ठिकाणी शहरातील नागरिकांना जिमचे साहित्य व्यायामासाठी मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या कार्यक्रमासाठी शिवसेना तालुकाप्रमुख अनिल पाटील, शहर प्रमुख संजय शीलवंत, महिला आघाडी शहर प्रमुख कीर्ती स्वामी, माजी तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखुंडे, उपतालुकाप्रमुख डॉक्टर गौतम रोडे, बाळासाहेब वाघ, उपतालुकाप्रमुख सचिन सरडे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश करचे, महादेव सूर्यवंशी, रंभापूरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण, उपशहर प्रमुख सुरज कांबळे, प्रशांत चिवटे, जे जे युवा मंच अध्यक्ष जयराज चिवटे, शिवसेना करमाळा तालुका सचिव निलेश राठोड उपस्थित राहणार आहेत.
या इमारतीचे काम प्रसिद्ध ठेकेदार दिग्विजय देशमुख करणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान शहर प्रमुख संजय शीलवंत यांनी केले आहे.