करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दि.9 डिसेंबर रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालकांनीही आनंद लुटला. मेळाव्यात सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने खूप छान, चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. तसेच रानमेवा, हिरव्यागार पालेभाज्या, लिंब तसेच चहा, चायनीज इ. पदार्थ आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.
मुलांचा शिकण्याचा उत्साह टिकवून ठेवणे आणि त्यांना शैक्षणिक व्यवस्थेत समाकलित करणे. अतिरिक्त अभ्यासक्रमांद्वारे मुलांच्या सर्वांगीण वाढीस प्रोत्साहन देणे. मुलांमध्ये आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, योग्यता, नेतृत्व, सहनशीलता आणि शारीरिक वाढ वाढवणे हाच या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकांच्या हस्ते करण्यात आले. चिमुकल्या पासून अबाल वृद्धांनी मेळाव्याला हजेरी लावली होती.
आनंद मेळाव्यासाठी मार्गदर्शन स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांचे लाभले तर परिश्रम शिक्षक कर्मचारी यांनी घेतले होते