करमाळा प्रतिनिधी

२६ नोव्हेंबर २०२४ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राध्यापक अभिजीत लोंढे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल बी पाटील हे होते.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. अभिजीत लोंढे म्हणाले की, भारतीय संविधानामुळे स्वातंत्र्याचा खरा अनुभव आपणास येत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातात परिश्रमामुळे संविधानाची निर्मिती झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता यामुळे मानवी जीवन सुखी करण्यासाठी बाबासाहेबांमुळे मतदानाचा अधिकार श्रीमंत माणूस ते गरीब माणूस या सर्वांना समान मिळाला हे सर्व संविधानामुळे झाले असे त्यांनी आवर्जून सांगितले.

प्रा.डॉ. एल.बी. पाटील म्हणाले की, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना विविध अधिकार संविधानाच्या माध्यमातून दिले.

यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. प्रमोद शेटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. वंदना भाग्यवंत यांनी केले तर आभार कृष्णा कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *