करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, ‌ करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक गावामध्ये ‌प्रा. रामदास झोळ सर‌ फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात कायम कार्यरत राहणार असल्याचे ग्वाही प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केली. करमाळा विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था‌ निवडणूक‌ कार्यकर्ता विचारविनिमय बैठकीत ते बोलत होते. प्रा. रामदास झोळ सर संपर्क कार्यालय विकासनगर ‌करमाळा येथे ही बैठक संपन्न झाली. या बैठकीस शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ मंगवडे, ओबीसी काँग्रेस तालुका अध्यक्ष गफूर शेख, तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ, दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा मायाताई झोळ मॅडम, पोलीस मित्र संघटनेचे तालुकाध्यक्ष संभाजी शिंदे, वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, तालुका उपाध्यक्ष सुहास काळे पाटील‌, संजय जगताप सर, श्रीकांत साखरे-पाटील, भिमराव ननवरे यांच्यासह करमाळा माढा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, करमाळा ही आपली जन्मभूमी असून ‌त्याचे ऋण फेडण्यासाठी तसेच बारामती, पुणे, ‌इंदापूर ‌या शहराप्रमाणे ‌करमाळा तालुक्याचा ‌विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असून, संवैधानिक पदांच्या माध्यमातून तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज याचबरोबर शिक्षण, आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी आपण विधानसभेची निवडणूक लढवली. जरी आपला पराभव झाला असला, तरी परिवर्तनाच्या या ‌ लढाईमध्ये शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, युवक, महिलांचा मिळालेला पाठिंबा नक्कीच मला बळ देणार असून, जनतेच्या कल्याणासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुका गावागावामध्ये शाखा काढून, कार्यकर्त्यांना त्यामध्ये सहभागी करून, समाजकारणातून राजकारण करण्याचा मानस असल्याचे प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. कमी कालावधीमध्ये जनतेचे भरभरून प्रेम मिळाले. शेतकरी हितासाठी आंदोलनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस बिल मिळवून दिले आहे. गावागावामध्ये टँकरने‌‌ पाणी पुरवठा, बाकडे वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक पॅड वाटप, नवरात्रात भक्तांना‌ मोफत देवदर्शन यात्रा, मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना पाठबळ देण्यासाठी चार चाकी गाडयांना इंधन देण्याचे काम सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केले आहे. करमाळा तालुक्यातील ११८ गावे, माढा तालुक्यातील छत्तीस गावे यांनी केलेले प्रेम, स्वागत नक्कीच प्रेरणादायी असून कार्यकर्त्यांनी हिम्मत ना हरता नवीन वर्षात ‌संकल्प करून, गाव तिथे ‌आपला माणूस, आपले विचार पोहोचण्यासाठी ‌ कार्यरत राहावे. उद्याचा सूर्य नक्कीच आपणास यशाच्या शिखरावर नेणार आहे.

यावेळी अध्यक्षीय भाषण करताना शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की, करमाळा तालुक्यात प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशनच्या शाखा काढुन, गावागावात कार्यकर्त्याचे संघटन उभा करून त्यांना पाठबळ देऊन, करमाळा तालुक्यात राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन, करमाळा तालुक्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचे दशरथ आण्णा कांबळे यांनी विचार विनिमय बैठकीत व्यक्त केले. करमाळा तालुक्याच्या येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकीत आपले अंदाजे २० तरी प्रतिनिधी दिसतील अशी आशा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता नवीन वर्षामध्ये संकल्प करून गाव तिथे प्रा. रामदास झोळ सर यांचा परीवार मजबूत करण्यासाठी, फाउंडेशनच्या शाखा काढण्यासाठी कामाला लागावे. येणारा काळ आपल्याला नक्कीच मोठे यश देणार आहे. या बैठकीचे प्रास्ताविक श्रीकांत साखरे-पाटील यांनी केले. सूत्रसंचालन गोपीनाथ पाटील सर तर आभार शेतकरी संघटनेचे गणेश मंगवडे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *