करमाळा प्रतिनिधी
नशा मुक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियान हे दोन्ही सामाजिक उपक्रम अतिशय उत्साहात ब्रँड अँबेसिडर महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली वराग येथील नवीन मराठी प्राथमिक विद्यालय पंचशील नगर वैराग येथे संपन्न.
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजित उपक्रम नशा मुक्त भारत अभियान चे ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य हे ग्रामीण भागातील विविध प्रायमरी स्कूल हायस्कूल कॉलेजेस येथे हे उपक्रम राबवितात त्याला उत्स्फूर्तपणे सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे व अशा प्रकारच्या म्हणजेच नशा युक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियान या दोन्ही सामाजिक उपक्रमाची समाजाला खूप गरज आहे असे मत ठिकठिकाणी व्यक्त केले जात आहे त्यासाठी या पुढील आयुष्य या दोन्ही उपक्रमासाठी वेचणार आहे असे परखड मत महेश वैद्य आणि व्यक्त केले.
मुले ही फुले असतात असे आपण म्हणतो त्या फळाला पालकांनी तसेच शिक्षकांनी व्यवस्थित रित्या खत पाणी घालून म्हणजेच चांगले संस्कार करून त्यांना घडविले तर हे दोन्ही उपक्रम नशा मुक्त भारत अभियान व सशक्त भारत अभियान याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडतील असे प्रतिपादन महेश वैद्य यांनी केले. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात व्यसनापासून कसे दूर राहावे आणि त्याचे दुष्परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले आणि त्याचबरोबर बुद्धी आणि बल याची सांगड घातली तर जीवनात यशस्वी होता येते आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ऊर्जा मिळते त्यासाठी दररोज अर्धा तास विद्यार्थ्यांनी व्यायाम करावा त्याने आपल्या शरीर सशक्त सुदृढ आणि निरोगी राहील.
त्याचप्रमाणे आहारामध्ये पिझ्झा बर्गर वडापाव इत्यादी पदार्थ घेणे टाळावेत त्याऐवजी दूध केळी चिकू सफरचंद पालेभाज्या भाकरी अशा प्रकारचे सकस आहार आपल्या आहारात असावेत त्याने चांगला परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो.
शालेय जीवनात मुलांनी दररोज अर्धा तास व्यायाम सकस आहार नित्यनियमित अभ्यास यावर लक्ष केंद्रित करावे आणि तंबाखू गुटखा सुपारी दारू अशा गोष्टीपासून खूप खूप दूर राहावे आणि अशा गोष्टी जे वडीलधारी मंडळी आणण्यास भाग पाडतील त्यांना स्पष्टपणे नकार द्यावा.
शाळेच्या विद्यार्थ्याना अतिशय उत्तम रित्या शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यायाम कसा करायचा याबद्दल प्रत्यक्ष कृती द्वारे बेसिक व्यायामाचे ट्रेनिंग विद्यार्थी विद्यार्थिनींना दिले त्याबरोबरच स्टाफ देखील या सहभागी झाला होता ही विशेष बाब आहे.
समाजातील ज्या व्यक्तीला आरोग्याचे महत्त्व समजले व्यायामाचे महत्त्व समजले अशा व्यक्ती नसेच्या आहारी जात नाहीत असे स्पष्ट यांनी व्यक्त केले.
आपल्याला व्यसनमुक्त भारत आणि सशक्त भारत आपला देश बनवायचा आहे त्यासाठी त्याची सुरुवात आपल्यापासूनच करायची आहे आणि हे अशक्य नाही सर्व मुलांनी मुलींनी ठरविले तर नक्कीच आपण सशक्त भारत अभियान नशा मुक्त भारत अभियान यशस्वी करूत.
त्यासाठी मन हे अतिशय खंबीर पाहिजे चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी या मनाला कळतात त्यावर मनावर ताबा असणे अत्यंत गरजेचे आहे आणि तो कसा येईल तर तो व्यायामाद्वारे येईल असे मत महेश वैज्ञानिक व्यक्त केले.
नशा मुक्त भारत अभियान आणि अभियान ही काळाची गरज आहे याची पावले ओळखूनच समाजातील प्रत्येक घटकांनी आत्मपरीक्षण करणे खूप गरजेचे आहे.
आणि हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपला देश नशा मुक्त तसेच सशक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने या अभियानास जोडले पाहिजे.
या कार्यक्रमाची प्रस्तावना स्वप्नील तुपे सर यांनी केली आणि या कार्यक्रमास समाजसेवक महेंद्र निंबाळकर हे आवर्जून उपस्थित होते तसेच प्रसाद जोशी आणि योगेश खूने, सुकात जेवळीकर, राहुल करंडे तसेच शंकर शेंडगे यांचे सहकार्य लाभले.
शाळेच्या वतीने महेश वैद्य यांचा फेटा शाल आणि श्रीफळ देऊन बाळासाहेब गवळी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा उपक्रम अतिशय खेळ म्हणजे वातावरणात पार पडला.