करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे ‘हॅपी थॉट्स’द्वारे तणावाचे व्यवस्थापन कसे करावे, या विषयी प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यासाठी कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेत हॅपी थॉट्स करमाळा शाखेचे वालचंद माने व सुवार्णा पाटणे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये विचार बदलले की जीवन बदलते, आनंदी विचारांद्वारे तणावाचे व्यवस्थापन, निरोगी जीवन, योग, प्राणायाम यांचे महत्त्व, स्मरणशक्ती वाढविणे तसेच ध्यानाचे प्रात्यक्षिक करून घेतले.
सदर कार्यशाळा आंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) विभाग व तेजज्ञान फौंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.