पणजी, गोवा: अखिल गोमंतक नाभिक समाज-गोवा, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, आणि ऑल इंडिया महापद्मनंद कम्युनिटी एज्युकेटेड असोसिएशन, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच गोवा राज्य कला आणि सांस्कृतिक संचालनालयाच्या सहकार्याने भारत रत्न जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

अतिथी : रवी नाईक (कृषी आणि नागरी पुरवठा मंत्री, गोवा), सुभाष शिरोडकर (जलसंपदा आणि सहकार मंत्री, गोवा), गोविंद गावडे (कला आणि सांस्कृतिक मंत्री, गोवा), सुभाष फळदेसाई (सामाजिक कल्याण मंत्री, गोवा)

विशेष निमंत्रित : अ‍ॅड. ओमेंद्र शर्मा (वकील, दिल्ली उच्च न्यायालय), सयाजीराव झुंजार (अध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ), कमलकांत काळे (राष्ट्रीय अध्यक्ष, युनिटी ऑफ मूळनिवासी समाज, नवी दिल्ली), डॉ. वीरेंद्र कर्पूरी ठाकूर (पाटणा, बिहार)

कार्यक्रमाचा तपशील : तारीख : रविवार, ८ डिसेंबर, २०२४

वेळ : दुपारी २:३० वाजता

स्थळ : राजीव गांधी कला मंदिर, फोंडा, गोवा

कार्यक्रमाच्या विशेष सोहळ्यात गोवा राज्यातील १९ ओबीसी समुदाय संघटनांच्या अध्यक्षांचा सन्मान करण्यात येईल.

आयोजकांची विनंती : या कार्यक्रमास आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

आयोजक : डॉ. सुजाता रायकर (अध्यक्ष, अखिल गोमंतक नाभिक समाज), मधु नाईक (अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ), अ‍ॅड. रामशील शर्मा (राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया महापद्मनंद कम्युनिटी एज्युकेटेड असोसिएशन, नवी दिल्ली)

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *