करमाळा प्रतिनिधी

नादिया चौहान यांनी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी, 2003 साली आपल्या वडिलांच्या “पार्ले अ‍ॅग्रो” समूहामध्ये प्रवेश केला. त्यांनी त्यांच्या कल्पक दृष्टिकोनाने आणि धाडसी निर्णयांनी कंपनीला नवा आयाम दिला.

प्रारंभी, त्यांनी कंपनीची “फ्रूटी”वर असलेली 95% महसुलाची अवलंबिता कमी करण्यासाठी पावले उचलली. यासाठी त्यांनी “बैलीज” हा पॅकेज्ड वॉटर ब्रँड लाँच केला, जो सध्या 1000 कोटींच्या व्यवसायाचा भाग आहे. या योजनेत वितरण व्यवस्था आणि धाब्यांशी तसेच लांब पल्ल्याच्या बस ऑपरेटर्ससोबतच्या टाय-अप्सवर भर देण्यात आला. परिणामी, पार्ले अ‍ॅग्रो समूहाचा महसूल 5000 कोटींपर्यंत दुप्पट झाला.

त्यानंतर, 2005 साली नादिया यांनी आपल्या “अ‍ॅपी फिझ” या कल्पनेला मूर्त स्वरूप दिले. तेव्हा भारतात अॅपल ज्यूस नव्हता, पण त्यांनी हा उत्पादन प्रकार बाजारात आणून प्रचंड यश मिळवले. 36% CAGR दराने वाढ करणाऱ्या या उत्पादनाने 99% मार्केट शेअर मिळवला आणि संपूर्ण उद्योगासाठी नवा मानदंड ठरला.

याचबरोबर, त्यांनी “फ्रूटी” या प्रमुख उत्पादनाचीही जबाबदारी घेतली. त्यांनी फ्रूटीला वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये लाँच करत “न्युट्रिझ” ब्रँड तयार केला आणि पॅकेजिंग बदलून PET बाटल्यांमध्ये सादर केले. या बदलामुळे आजची फ्रूटी नवी ओळख घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचली.

ब्रँडला अधिक लोकप्रिय बनवण्यासाठी, त्यांनी योग्य सेलिब्रिटींची मदत घेतली. आलिया भट्ट आणि रामचरण यांसारख्या सुपरस्टार्सला “फ्रूटी फिझ” च्या जाहिरातींसाठी साइन केले. आकर्षक जाहिराती, अनोखी वेशभूषा आणि quirky पॅकेजिंगमुळे हा निर्णयही यशस्वी ठरला. फक्त 300 कोटींच्या जाहिरात खर्चातून 2000 कोटींहून अधिक महसूल मिळवण्यात आला.

आज फ्रूटी कंपनीच्या महसुलात फक्त 48% योगदान देते, परंतु नादिया यांनी कंपनीच्या व्यवसायाचा विस्तार करत त्याला विविध उत्पादन श्रेण्यांमध्ये प्रस्थापित केले आहे. नादिया चौहान आणि त्यांच्या टीमने साधलेले हे यश खरोखरच प्रेरणादायी आहे ! ही कथा अनेक महिलांना आपल्या स्वप्नांची उंची गाठण्यासाठी प्रेरणा देईल !

सोशल मिडीयावर व्हायरल ?

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *