करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील ते ओबीसींना न्याय देतील अशी मागणी ओबीसी नेते तथा मा. भाजपा सोलापूर जिल्हा चिटणीस विनोद महानवर यांनी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचे जास्त उमेदवार निवडून आले आहे. हे उमेदवार निवडून येण्याचे एकमेव कारण आहे की, सर्व ओबीसी समाज भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे यामुळे भाजपाचे देवेंद्र फडणवीस, सेनेचे एकनाथ शिंदे,राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांचे असंख्य उमेदवार निवडून आले आहे. आता या सत्ताधारी मंडळींनी ओबीसी समाजाला न्याय देण्याची वेळ आली आहे व ते देतील असा विश्वास ओबीसी नेते तथा मा. सोलापूर जिल्हा भाजपा चिटणीस विनोद महानवर यांनी सांगितले आहे.