करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरातील दोन रुग्णांना प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने दत्तक घेऊन सहा महिन्याच्या पूर्ण कालावधीसाठी निक्षय मित्र या नात्याने पोषण आहाराचे संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुंजकर

यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. गुंजकर बोलताना म्हणाले की, संस्थेने रुग्णालयातील रुग्णांना पोषण आहार वाटप केल्याबद्दल आभार मानतो व पुढील सामाजिक कार्यासाठी उपजिल्हा रुग्णालय सदैव आपल्याला सहकार्य करू तसेच या

पोषण आहार किती साठी सद्गुरू कृपा फर्निचर चे मालक गणेश तळेकर व प्रशांत पाटुळे यांनी सहकार्य केले. यावेळी श्रीहरी ढावरे, अलीम शेख, नरेंद्र ठाकूर, शिवनाथ घोलप, डॉ. राऊत, ए. टी.एस चव्हाण, ए. टी. एल. एस. विभूते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी केले तर श्रीहरी ढावरे यांनी आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *