करमाळा प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्लेसमेंट सेल व आय.क्यू.ए.सी. यांच्या वतीने कॅम्पस इंटरव्यूव्ह संपन्न झाले. या इंटरव्यूमधून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना एच.डी.एफ.सी., इंडस बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, बंधन बँक या बँकांमध्ये सेल्स ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर, ऑफिसर या पदावर नियुक्त्या होणार आहेत. यासाठी महाविद्यालयामध्ये एकूण ३१ माजी विद्यार्थ्यांनी इंटरव्यूव्ह दिले. हे इंटरव्यूव्ह सर्व शाखेतील पदवीधरांसाठी खुल्या होत्या.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, जागतिकीकरणाच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मागे राहता कामा नये व जीवनामध्ये मोठे होण्यासाठी अंगी संयम ठेवणे खूप महत्त्वाचे असते.

 यासाठी महाविद्यालय, संस्था व विलासराव घुमरे सर यांच्या मार्गदर्शनानुसार अशा कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त व स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी व्यवस्थापक चंद्रशेखर शिलवंत सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लेसमेंट सेल व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कृष्णा कांबळे यांनी केले,

सूत्रसंचालन डॉ. अस्मिता सुपेकर यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रा.सुधीर मुळीक यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. ए.पी. माने, डॉ.व्ही.वाय. खरटमल, डॉ.ए.टी. करपे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *