
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा व आय बी एफ एस ए च्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे शुक्रवार, दिनांक- 18.10.2024 रोजी प्लेसमेंट कॅम्प घेण्यात येणार आहे.

एच डी एफ सी बँक, एंडसिंड बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, बंधन बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, एयु स्मॉल फायनान्स बँक, उजजीवन स्मॉल फायनान्स बँक, इक्वायटस स्मॉल फायनान्स बँक, आय बी एफ सी फर्स्ट बँक, आर बी एल बँक, डीसीबी बँक, मुथुट फायनान्स, पीएनबी

हाउसिंग फायनान्स, आय सी आय सी आय बँक, आणि इतर नोकरीची संधी उपलब्ध आहे. नोकरीचे क्षेत्र महाराष्ट्र असून शैक्षणिक पात्रता शाखेचा पदवीधर असावा.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व सर्व पदवीधर विद्यार्थ्यासाठी या मुलाखती ठेवलेल्या आहेत. तरी पदवीधर विद्यार्थ्यांनी मुलाखतीस उपस्थित राहावे असे आवाहन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. बी. पाटील सर यांनी केले आहे.