
करमाळा :- करमाळा शहरातील बरेच दिवसापासुन प्रलंबित असणारे पाणी पुरवठा च्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष संजय (बापु) घोलप यांनी वारंवार नगरपालिकेचे मुख्याधिकारी व आमदार संजय मामा शिंदे यांना पत्राद्वारे

नगरपालिकेतील पाण्याचे मोटर खराब आहे त्या संदर्भात आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून करमाळ्यातील नागरीक महिला पाण्यासाठी एक वर्षापासुन वंचित राहिले आहे हि पाणी टंचाई उन्हाळ्यात निसर्ग निर्मित होती परंतु उजनी 100% भरून पण तशीच आधिकारी यांच्या हालगर्जी

पणा मुळे कृत्रिम टंचाई झाली. त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करमाळा च्या वतीने नगरपालिकेत महिलांसह निवेदन दिले होते त्याची दखल घेत लोकप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांनी दहिगांव येथील पिण्याच्या पाण्याच्या मोटर साठी 1कोटी 40 लाख निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल

करमाळा शहर व महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा मनापासून आभारी आहे.तसेच धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान करमाळा व व्यापारी मित्रांसह शहरातील सुरक्षेच्या प्रश्नासाठी शहरातील प्रमुख चौकात व बायपास शाळा परीसरात जवळपास 300 cctv कॅमेरे बसवण्याची मागणी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण चे अध्यक्ष मनसे तालुकाध्यक्ष संजय

बापु घोलप यांच्यासह व्यापारी मित्रांनी पत्रासंह केली होती त्यासाठी पण 30 लाख निधी तत्काळ आमदार फंडातून उपलब्ध करून दिला त्याबद्दल आम्ही अशा लोकप्रिय आमदार यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी असुन त्याचे बद्दल एकच वाक्य आठवते बोले तैसा चाले… त्याची वांदिले पाऊली… त्याच बरोबर शहरातील बरीच विकास निधी पडलेला आहे. मला वाटतं करमाळा शहरात एवढा निधी पहिल्या वेळेसच आला आसावा. शेवटी तुम्ही जसे काम करता तसे त्याचे फळ असते. ते येणाऱ्या विधानसभेत दिसुन येईल.