
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब व मानसशास्त्र विभाग यांच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह व आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालय, करमाळा

येथील आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश अभंग हे प्रमुख वक्ते व प्रमुख पाहुणे समुपदेशक कपिल भालेराव हे उपस्थित होते. डॉ. अभंग यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामधून विद्यार्थ्यांनी या धावपळीच्या काळामध्ये शरीराबरोबरच

मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच मोबाईलचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करावा असे मत व्यक्त केले. त्यांनी आपल्या प्राचीन संस्कृती व आयुर्वेदातील उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांनी आपली दिनचर्या कशी ठेवावी व व्यसनापासून दूर कसे राहावे हे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील हे होते त्यांनीही आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी आचरण कसे करावे हे सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. प्रमोद शेटे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. वंदना भाग्यवंत यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रा.दीपक सोनवणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना व मानसशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
