
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर मुक्तदवार वाचनालय करमाळा नगरपरिषद येथे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा

करण्यात आला. प्रथम डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यालयीन प्रमुख व सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच वाचनालयातील सभासद, कर्मचारी, वाचक वर्ग व अभ्यासिकेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी वाचनालयात पुस्तकांचे वाचन करण्यात आले.


