करमाळा प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठान संघटनेच्या वतीने नवरात्र निमित्त दररोज पहाटे पाच वाजता दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात आले होते. गावातील तरुण भगवा ध्वज हातात धरून गावातून दौड काढण्यात येत होती. गावातील जागोजागी या ध्वजाची पूजा

ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत होती. आज दसऱ्यानिमित्त दुर्गामाता दोन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सुरुवातीला ग्रामस्थांच्या वतीने या दोडके स्वागत करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार विठ्ठल पाटील महाराज यांनी उपस्थित

तरुणांना व्यसनमुक्त राहून देशसेवेसाठी त्यागाची भावना मनात निर्माण करण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यवान लबडे यांनी केले. गणेश मोरे, कन्हैया पाटील, गणेश पोळ यांनी देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात

केली. या कार्यक्रमाला उपसरपंच शिवाजी पोळ, राजाभाऊ रोंगे महाराज, बापूराव नाईकनवरे महाराज, माजी सरपंच मुरलीधर पोळ,, महादेव लबडे, गंगाधर पोळ, विठ्ठल रोंगे, अमोल घोगरे, भुजंग गोरे, विशाल नाईकनवरे, अनिल पोळ, लिलाधर पोळ, सुधिर पोळ, मारूती पाटील, महेश सातपुते, राजेंद्र साबळे, नानासाहेब साळूंके यांच्यासह गावातील तरूण बहुसंख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *