
करमाळा विधानसभेची उमेदवारी काँग्रेसलाच मिळावी- अध्यक्ष प्रतापराव जगताप
करमाळा प्रतिनिधी
उद्या मुंबई येथे करमाळा विधानसभेच्या उमेदवारी बाबत बैठक आहे करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी अशी मागणी आम्ही केली असल्याची माहिती काँग्रेसचे करमाळा तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी दिली आहे
पूर्वी करमाळा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता तसेच करमाळ्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे आम्ही दुसऱ्या पक्षाला उमेदवारी दिल्यास त्यांना सहकार्य करणार नाही कारण नंतर ते याची जाणीव ठेवत नाही यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भेटून काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी याबाबत आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे
यावेळी दादा कुदळे – काँग्रेस किसान सेल तालुका अध्यक्ष, दस्तगीर पठाण- काँग्रेस आहे अल्पसंख्यांक सेल जिल्हा उपाध्यक्ष ,अशोक घरबुडे- काँग्रेस करमाळा तालुका उपाध्यक्ष , सुजय जगताप – युवक काँग्रेस आय करमाळा शहराध्यक्ष , छगन मोहोळकर – करमाळा तालुका काँग्रेस आय उपाध्यक्ष,देवराव सुकळे – काँग्रेस आय भटक्या
विमुक्त जाती करमाळा तालुका अध्यक्ष ,रमजान भाई मुलानी – करमाळा तालुका काँग्रेस आय तालुका उपाध्यक्ष ,गणेश फरतडे – करमाळा तालुका काँग्रेस आय सरचिटणीस ,हर्षद काळे- करमाळा तालुका युवक काँग्रेस आय उपाध्यक्ष आदीजण उपस्थित होते