
करमाळा प्रतिनिधी
पद्मश्री डॉ. चंद्रकांत पांडव यांनी टायगर ग्रुप कार्यालयास सदिच्छा भेट दिली आहे.
टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांनी यावेळी यथोचित सन्मान पांडव यांचा केला. यावेळी एव्हरेस्ट शिखर चढणारे करमाळा येथील कोंढेज गावातील सध्या नागपूर येथे पोलिस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचाही सन्मान केला. यावेळी

श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा कमलाई नगरीचे संपादक जयंत दळवी, ज्येष्ठ पत्रकार अशोक नरसाळे, मनसे अध्यक्ष नानासाहेब मोरे, संभाजी होनप, शिवराज चिवटे, गणेश करे पाटील, डॉ. निलेश मोठे, अध्यक्ष पप्पू ओहोळ,

ईश्वर साने, बबलू पठाण, सोहेल पठाण, अखिप सय्यद, भैय्या साने, सोनू भोसले, ओम पाटोळे, कृष्णा आदीजण उपस्थित होते. यावेळी टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव म्हणाले की, श्वासात श्वास असेपर्यंत गोरगरिबांची सेवा करणार,

अहो रात्री मला कधीही फोन करा कसलेही काहीही असू द्या तुमच्या सेवेसाठी महाराष्ट्रात कुठल्याही तालुक्यात कुठल्याही गावात आमचे टायगर ग्रुपचे सदस्य आहेत कसली अडचण येऊ द्या, एक्सीडेंट असू द्या, ब्लड डोनेशन असू द्या किंवा असे काही असले तरी अहोरात्र सेवा करणार आहे. यावेळी मा. नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. पांडव यांनी त्यांचा सत्कार केला होता.