
करमाळा प्रतिनिधी
जातेगाव तालुका करमाळा येथे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांनी जातेगाव येथील कामटे वस्ती येथील पाझर तलाव चे रूपांतर साठवण तलाव यासाठी दोन कोटी वीस लाख रुपयांचा निधी दिला असून कामाच्या माध्यमातून जातेगाव च्या विकासात भर पडणार आहे.

तलावाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार संजयमामा शिंदे गटाचे नेते सुजित (तात्या) बागल, यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी जातेगाव चे माजी सरपंच काशिनाथ (तात्या) कामटे, गावचे पोलीस पाटील प्रवीण शिंदे (गुरुजी), जातेगाव चे उपसरपंच बाबासाहेब शिंदे, जातेगाव सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कामटे, वडगाव गावचे नेते सागर अंधारे,

ग्रामपंचायत सदस्य अच्युतराव कामटे, तुषार शिंदे, अरुण जगताप, पांडुरंग कामटे, भागवत कामटे, लक्ष्मण जगताप, रमेश जगताप, सुभाष जगताप, बिभीषण कामटे, अजय जगताप, सोमा कामटे, भाऊ कामटे, राहुल शिंदे, छोटू पोळ, अशोक ससाणे, सागर शिंदे, बाळासाहेब शिंदे, जातेगाव व वडगाव येथील ग्रामस्थ व शिवनेरी कंट्रक्शन चे सर्व स्टाफ उपस्थित होते. उपसरपंच बाबासाहेब शिंदे व अच्युतराव कामटे यांनी आभार मानले.
