करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील केशव आदलिंग यांना उपमुख्यमंत्री राज्यस्तरीय विशेष मदत कक्षमधून ३ लाख रुपयांची आर्थिक मदत झाली आहे. चंद्रपूर विधानसभा आमदार किशोर जोरगेवार यांच्यामार्फत त्यांना उपचारासाठी मदत झाली आहे.

       काही दिवसांपूर्वी त्यांना केईएम हॉस्पिटल पुणे येथे न्यूमोनिया व स्वाइन फ्लू उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराचा खर्च ७ लाखांच्या वर होता. त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता होती. रुग्णांचे बंधू भैरवनाथ आदलिंग यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वीय सहाय्यक गणेश जगताप यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आमदार जोरगेवार यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री यांच्या ऑफिसमध्ये सहाय्यता निधीसाठी अर्ज केला. त्यामुळे आदलिंग यांना ३ लाख रुपये आर्थिक मदत झाली. त्यामुळे त्यांचा मोठा आर्थिक प्रश्न सुटला. त्यांच्यावर डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती रुग्णांचे नातेवाईक यांनी दिली.रुग्णाच्या नातेवाइकांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे विशेष आभार मानले आहेत.

………………………

आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून आमचे भाऊ केशव यांना उपचारासाठी ३ लाख मदत झाली. यामुळे आम्हाला मोठी आर्थिक मदत झाली.याकामी स्वीय सहाय्यक गणेश जगताप यांनी मोलाचे सहकार्य केले – भैरवनाथ आदलिंग (कोंढेज)

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *