
करमाळा प्रतिनिधी
प्रदीपकुमार बुवासाहेब जाधव पाटील वय 65 रा. तरटगाव ता करमाळा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. अंत्यविधी सकाळी 10 वाजता तरटगाव येथे होईल.

त्यांच्या पश्चात बंधु संतोष जाधव पाटील, मुलगा डाँ. रोहन जाधव पाटील, अभिजित जाधव पाटील, पुतण्या अजिंक्य जाधव पाटील यांच्यासह आई, पत्नी, बहीणी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
प्रदीपकुमार बुवासाहेब जाधव पाटील हे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते. तालुक्यातील राजकारणातील मोठ व्यक्तीमत्व होते. त्यांचे बंधू संतोष जाधव पाटील हेही आदिनाथचे माजी चेअरमन होते. जाधव पाटील परिवारास मानणार मोठा वर्ग आहे.