कुर्डूवाडी प्रतिनिधी

कूर्डुवाडी शहर नाभिक समाजाची बैठक आण्णा हॉटेल येथे राष्ट्रीय नाभिक संघटना प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली. यावेळी विविध सामाजिक विषयावर चर्चा झाली. अनेक ठराव ही यावेळी मंजुर करण्यात आले. 

श्री संत सेना महाराज पुण्यतीथी निमित्त धार्मीक कार्यक्रम आयोजन करणे तसेच खासदार फंडातुन मंजुर झालेल्या सभामंडपाचे भुमीपुजन विविध क्षेञातील मान्यवरांच्या हस्ते ऊदघाटन करणे तसेच नाभिक समाजातील ५० वय असलेले समाज बांधव, शासकीय कर्तव्य बाजावत असलेले नाभिक बांधव, भगीनी तसेच १० वी १२ वी तील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्याचे तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्याचे यावेळी ठरले. यावेळी कुर्डुवाडी शहर नाभिक असोशिएनची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

शहरअध्यक्षपदी ईश्वर गाडेकर, ऊपाध्यक्षपदी अजय काशिद, सचिवपदी नंदकिशोर वाघमारे, खाजिनदारपदी अविनाश कोकाटे यांची निवड करण्यात आली. यावेळी मा.अध्यक्ष प्रकाश अवचर, रामभाऊ राऊत, अतुल राऊत, संजय गाडेकर महाराज, संतोष गाडेकर, नागेश ताटे, बापु दळवी, संजय काशिद, विनोद गायकवाड, सुधिर काशिद, सैदोबा महाबोले, बंडु चौधरी, योगेश गाडेकर, शुभम क्षिरसागर, राजु सावंत आदी समाज बांधव यावेळी ऊपस्थीत होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *