
करमाळा प्रतिनिधी
पांगरे हायवे ते वांगी नं. 1 रस्ता अतिशय खराब झाला होता. हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला असून सध्या दोन्ही साईट पट्या वर मुरूम टाकण्याचे काम पांगरे हायवे ते गुटाळ मॉडर्न प्रशाला पर्यंत पूर्ण झाले आहे. सर्व शेतकरी वर्ग प्रशासनाला सहकार्य करीत आहे.

परंतु मी प्रताप सर्जेराव पारेकर प्रशासनाला विनंती करतो की माझी गट क्र. 224 मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती आहे. रस्त्याच्या पूर्वेला माझे घर आहे तरी पश्चिमेच्या बांधाच्याकडेनी चार मीटर जागा देण्यात तयार आहे. रस्ता साठी सर्व सहकार्य करणार असून माझ्यावर कोणताही अन्याय होऊ नये हे प्रशासनाला आवाहन करीत आहे.

