करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात चिखलठाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगेश सरडे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आज (शनिवारी) संपर्क कार्यालयात सत्कार झाला.
यावेळी मकाईचे संचालक महादेवराव सरडे, अॅड. जयदीप देवकर, चिखलठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक मच्छिंद्र सरडे, कुगावचे उपसरपंच दादासाहेब डोंगरे, नागनाथ सरडे, चिखलठाण ग्रामपंचायत सदस्य अक्षय सरडे, समाधान गव्हाणे, बब्रुवान मोरे पाटील, अर्जुनराव अवघडे आदी मान्यवर उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघ संचालिका रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखाली सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. गावाच्या हितासाठी व प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले.