दहिगाव चे पाणी नेरले वडशिवने तलावात सोडण्याची मागणी नेरले ग्रापं माजीसरपंच यांनी केले आहे. दहिगाव चे पाणी नेरले सालसे व वडशिवने तलावात सोडण्याची मागणी नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी केले .आहे पावसाळा सुरू असला तरी सालसे केम नेरले परिसरामध्ये पाऊस समाधानकारक नाही.त्यामुळे विहिरीला ओढ्याला पाणी नाही कुर्डूवाडी करमाळा रोड जवळ साडे ओढ्यावर नेरले सालसे तलाव आहे .व घोटी येथून येणाऱ्या ओढ्यावर देखील नेरले येथे तलाव आहे.या दोन्ही ओढ्यावर अनेक छोटे मोठे बंधारे आहेत.बंधाऱ्यात व तलावात थेंब देखील पाण्याचा नाही जनावरांना चारा उपलब्ध झाला आहे.पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे .त्यामुळे उजनी धरण भरण्याच्या मार्गावर आहे.पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडणे गरजेचे आहे .दोन्ही तलावाच्या पाण्यावर वरकुटे अळसुंदे सालसे नेरले आवाटी लोणी तालुका माढा या वडशिवणे तलावावर देखील केम सह अनेक गावाचा पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या सिंचनाचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अवलंबून आहे.दहिगाव योजनेचे पाणी साडे येथून सोडल्यास नेरले सालसे तलाव भरू शकतो हो निंभोरे घोटीयातून सोडल्यास दुसरा तलाव बंधारे भरू शकतात पाणी सोडण्याचे आम्ही अनेक वेळा मागणी केली आहे .आम्हाला सांगितले जाते हे तलाव दहिगाव उपसा सिंचन योजने त समाविष्ट नाहीत ही गावे दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये समाविष्ट आहेत .मग गावात असणारे तलाव योजने समाविष्ट कसे काय असू शकत नाहीत .असा प्रश्न सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे त्याचा विचार लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी यांनी करावा अशी विनंती नागरिकांच्या वतीने नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक श्री औदुंबर राजे भोसले यांनी केली आहे.