करमाळा – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर जिल्हा शाखेची जिल्हा बैठक करमाळा येथे संपन्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सोलापूर या जिल्ह्याची जिल्हा बैठकीचे आयोजन करमाळा अनिस शाखेने यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था यशकल्याणी सेवाभवन करमाळा येथे केलेले होते बैठकीच्या सुरवातीला करमाळा अनिस शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते इसाक उर्फ अशोक पठाण सर व अशोक इंदुरे यांना आदरांजली वाहण्यात आली बैठकीची सुरुवात आनंदी ताई घिगे पाटील व अनिल माने यांच्या चळवळीच्या गीताने करण्यात आली पहिल्या सत्रामध्ये जिल्ह्याच्या शाखा निहाय आढावा घेण्यात आला यामध्ये प्रत्येक शाखेने आपल्या शाखेचे अहवाल वाचन केले महाराष्ट्र राज्याचे अनिसचे सरचिटणीस सुधाकर काशीद यांनी राज्य कार्यकारणीचा अहवाल सादर केला व आधुनिक भोंदू बुवाबाजी विषयी प्रबोधन केले त्याबरोबर नोव्हेंबर २०२४ रोजी आळंदी येथे महाराष्ट्र अनिसचे ३५ वर्ष पूर्ती निमित्ताने होणाऱ्या अधिवेशनास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा कार्याध्यक्ष धर्मराज चवरे यांनी अनिसची पंचसूत्री समजावून सांगितली राज्याचे बुवाबाजी संघर्ष कार्यवाह अँड. गोविंद पाटील यांनी कार्यकर्ता कसा असावा याचे विस्तृतपणे मार्गदर्शन केले दुसऱ्या सत्राची सुरुवात मा. प्राचार्य नागेश माने यांच्या मधुर बासुरी वादनाने व कवी नवनाथ खरात सर यांच्या चळवळीच्या गझलेने करण्यात आली संतोष माने , किसन कांबळे व टेंभुर्णी शाखेचे कार्याध्यक्ष नागनाथ शिंदे यांनीही आपले मनोगते व्यक्त केली प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर शाखेचे व्ही. आर. गायकवाड सर व करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर स्मिता बंडगर तसेच विजयसिंह ओहोळ ग्रामपंचायत सदस्य केम हे मान्यवर उपस्थित होते यावेळी सौ.शितलताई गणेश करे पाटील यांचा अनिस कार्यकर्त्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश भाऊ करे पाटील यांचे लाभले डॉ. अॅड . बाबुराव हिरडे यांचे “आत्मघात” व्यसन दुष्परिणाम व व्यसनमुक्ती या विषयाचे पुस्तक दादासाहेब पिसे यांचे “प्रवासात” कवितासंग्रह हे पुस्तक आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सप्रेम भेट देण्यात आले करमाळा अनिस शाखेचे संजय हंडे, दिगंबर साळुंखे, बाळासाहेब दुधे, रामचंद्र बोधे कैलास लोंढे, संतोष कांबळे, दादासाहेब पिसे, डॉ.आप्पासाहेब लांडगे, भिवा आप्पा वाघमोडे, महादेव कन्हेरे, महेश वैद्य ,जनार्धन पवार सर, प्राध्यापक शिवाजी दळवी, विठ्ठल साळुंखे, गजेंद्र गायकवाड, संभाजी अनंत कवळस, मनोहर गोडसे, विठ्ठलराव वठारे, अँड.संजय कांबळे, मोहित निकम, मीनाक्षी हंडे, संगीता निंबाळकर, ज्योती साने, सानिका माने, स्वाती माने,ओंकार माने, श्रेयस साने, तेजस्विनी साने आरती चोपडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक करमाळा अनिस शाखेचे कार्याध्यक्ष अनिल माने यांनी केले व आभार राजेंद्र साने यांनी मानले कार्यक्रमाची सांगता ” हम होंगे कामयाब” या गीताने करण्यात आली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *