
करमाळा प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर, किल्ला वेस आणि कुंभारवाडा या परिसरातील नागरिकांसाठी पूर्वी या ठिकाणी सार्वजनिक शौचालय उपलब्ध होते. परंतु काही वर्षांपूर्वी प्रशासनाने येथील नागरिकांचा कोणताही विचार न करता येथील शौचालय पाडण्यात आले. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे नाहक हाल होत आहे. येथील नागरिकांना शौचालयसाठी लांब जावे लागत असल्याने लहान मुले आणि वयस्कर व्यक्ती मिळेल त्या जागेत शौचास बसतात. या शिवाय या परिसरातील नाल्यांची वेळेवर सफाई होत नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होत आहे.

तरी तातडीने या परिसरातील नागरिकांसाठी स्वच्छ जागेत शौचालय उपलब्ध करून द्यावेत तसेच या परिसरातील पुलाशेजारी नगरपरिषदेची जागा उपलब्ध आहे. या जागेमध्ये या परिसरातील लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा साठी बगीचा तयार करावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रेणुका राऊत यांनी केली आहे.

यावेळी भाजपा सरचिटणीस जितेश कटारिया, सामाजिक कार्यकर्ते जयंत दळवी, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष तिरुपती ठोंबरे तसेच ज्योस्ना बूदगे, विजाबाई इंगोले, अलका गायकवाड, नौशाद सय्यद यांच्या सह अनेक महिला उपस्थित होत्या.
