करमाळा प्रतिनिधी

संजय मामा हे करमाळा चे आमदार होणे गरजेचे का आहे ? कारण हा लोकनेता सर्वांना हवेहवेसे वाटणारा आहे, सर्वाना सोबत घेऊन चालणारा आहे, करमाळा तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यां सोबत विविध योजनांचा लाभ कसा होऊ शकतो, काय उपयोजना करावे, एखाद्या मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणण्यात येईल ह्याचे आभ्यास आहे व अगदी सहज उपलब्ध होणार नेतृत्व, त्यामुळे कुणाचे मन दुखावले जाणार नाही.  जिल्हातील व तालुक्यातील हक्काचा माणूस त्यांच्याकडे कामानिमित्त गेले असतां निस्वार्थ पणे ते काम करतात. “तुम्ही हाक द्या, मी साथ देईल” या तत्वावर ते कामे करत आले आहे.

फक्त काम अनुभव आणि कामे करण्याची जिद्द आणि चिकाटी, ते सहज जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतात. जनतेलाही मालक साहेब नको आहेत, त्यांना हवे आहे आपल्या मधीलच आपला जिवाभावाचा माणूस. आमदार संजय मामा शिंदे या व्यक्तीने आतापर्यंत करमाळा शहर व ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले असून त्यामुळे त्यांच्याकडे सर्वसामान्य जनतेचा कौल आहे.

आतापर्यंत केलेल्या कामाच्या जीवावरच त्यांनी, विविध पदे भूषविले आहेत. स्वयंप्रेरणेने आमदारकीच्या आखाड्यात शड्डू ठोकून पाहत आहेत. कारण त्यांना माहित आहे आजवर आपण केलेल्या कामाच्या जीवावर जनता आपल्याला साथ देईल व आशीर्वाद रुपी मतदान करेल. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, असा प्रश्न पडतो की, ह्या माणसाला आपण आमदार का करू नयेत म्हणून सत्तेवर असो किंवा नसो संजय मामा अवतीभोवती नेहमी, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची गर्दी असते, स्वतःला खूप मोठा नेता मी आहे ह्या तुऱ्यात कधीच न वावरणाऱ्या व्यक्तीला आमदार करणे गरजेचे आहे असे मला वाटते – एक कट्टर समर्थक किरण आण्णा फुंदे सरपंच लिंबेवाडी, ता. अध्यक्ष. रा. युवक काँग्रेस तालुका करमाळा.जि.सोलापूर

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *