
करमाळा प्रतिनिधी
न्यू यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री विद्यालय सालसे ता. करमाळा सन 2023-24 या वर्षातील इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने सन्मान संस्थेचे सचिव रविंद्र सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यापीठावर संस्थेच्या उपाध्यक्ष मनीषा तनपुरे, संचालक अनिल घाडगे भाऊसाहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तानाजी लोकरे, सतीश रुपणवर, शरद पवार, लहू येवले, वैभव घाडगे, आदी उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थी समृद्धी रामप्रभू गोंडगिरे 94.40टक्के, आर्यन विठ्ठल हांडे 93.60 टक्के, पायल देवेंद्रनाथ वायकुळे 92.40 टक्के या प्रथम तीन क्रमांक आलेल्या मुलांचा सत्कार करण्यात आला. याच बरोबर इयत्ता आठवी मधील एन. एम. एम. एस, परीक्षेमधील सारथी शिष्यवृत्ती मिळविलेल्या करन रोकडे, शिवराज गात, शुभम हांडे, अश्विनी बाबर, समाधान सालगुडे, श्रुती रोकडे यांनाही सन्मानित केले. या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमासाठी सालसे पंचकृषितील मोठ्या संख्येने पालक शिक्षण प्रेमी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घाडगे सर यांनी केले.
