करमाळा प्रतिनिधी

          आषाढी एकादशी साठी महाराष्ट्रातील वारकरी पंढरपूर येथे जात असतात या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. विशेषता श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही रावगाव रोड ते किल्ला वेस या मार्गावरून करमाळा शहरात येत असती. पालखीत अंदाजे 35 ते 40 हजार वारकरी असतात. या भागातील रस्त्यावर

अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे तसेच प्रत्येक ठिकाणी कचरा पडलेला असलेले दिसत आहे व काही ठिकाणी वेड्या बाभळीचे झाडे आलेले आहेत तसेच शहरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी नगरपरिषद जंतुनाशक पावडरची फवारणी करते व फिनेलचेही फवारणी केली जाते परंतु पंढरपूरला जाण्या करिता वारकरी चे आगमन करमाळा शहरात सुरू झालेले आहे परंतु पालिकेचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तरी नगर परिषदेने शहरातील सर्व खड्डे व साफसफाई तसेच जंतुनाशक औषधाची फवारणी लवकरात लवकर करावी अशी मागणी करमाळा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका बानू जमादार यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *