प्रतिनिधी करमाळा.

करमाळा तालुक्यातील ४० गावांतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी रिटेवाडी उपसा सिंचन योजना आहे. रश्मी दिदी बागल यांनी पक्ष प्रवेश करते वेळी एकच प्रमुख मागणी केली होती ती म्हणजे रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर करावी. याची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधीक्षक अभियंता सिंचन भवन पुणे यांना आवश्यक

लागणारा निधी उपलब्ध करून देणे विषयी अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आठवड्यात सदरील योजनेच्या सर्व्हे साठी जवळपास ४५ लाख रुपये एवढ्या निधीची तरतूद होणार आहे. भाजप प्रदेशउपाध्यक्ष रश्मी दिदी बागल यांच्या पाठपुराव्याला यश मिळत असून तालुक्यातील पांढरेवाडी व केम-वडशिवने उपसा सिंचन योजने साठी शासन दरबारी पाठपूरावा सुरू आहेत. रीटेवाडी उपसा सिंचन योजना तात्काळ पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येऊन आमचा हा भाग सुजलाम् सुफलाम् होणे विषयी आम्ही सातत्याने प्रयत्न राहीन असेही बागल यांनी बोलताना सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *