जेआरडी माझा

आज पुणे येथील विधान भवन येथे सोलापूर जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी विभागीय आयुक्त तसेच सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा नियोजन अधिकारी पवार, कार्यक्रम व कार्यकारी अभियंता उजनी लाभक्षेत्र त्याचबरोबर विभागीय आयुक्त करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे

उपस्थित होते. आज या बैठकीमध्ये सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उजनी पर्यटन विकास आराखडा सादर केला. या आराखड्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रस्ताव तपशील वार दाखल करावेत तसेच तात्काळ सुरुवातीस शंभर कोटी देण्याचे मान्य केले आहे. पर्यटनामुळे उजनी लाभ क्षेत्रातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यवसायास चालना देणाऱ्या सर्व धार्मिक तसेच कृषी पर्यटन चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे

पर्यटन विषय कौशल्यावर आधारित उपयोगाच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत यामध्ये टूर्स गाईड, वाहन, व्यवसाय, बांधकाम, स्वयंरोजगार, स्वच्छता सेवा, प्लंबिंग कृषी, मालाला स्टेट बाजारपेठ त्याचबरोबर उजनी परिसरातील ग्रामस्थांना  स्वयंरोजगार प्राप्त होईल त्याचबरोबर समुदाय आधारित संस्थांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत्र निर्माण होणार आहे. याबाबतीत आमदार संजय मामा शिंदे यांनी सांगितले बरेच दिवसा पासून पाठपुरावा करून तत्कालीन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी बैठका घेतल्या होत्या त्याला आज मूर्त स्वरूप आत्ताचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे मुळे झाले व दादांनी पृस्ताव मान्य करून येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मधे मंजूरी देण्याचे मान्य केले आहे.

उजनी जलाशयातील पक्षी वैभव मध्ये भर पडणार आहे. तब्बल 230 पक्षाच्या प्रजाती देशी-विदेशी पक्षाचे स्थलांतर यानिमित्ताने पक्षी पर्यटना चालना भेटणार आहे तसेच वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये यात क्लब वॉटर लाईट हाऊस आकर्षक पेडल बोर्ड इत्यादी वोटिंग संदर्भातल्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत जाणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील जे धार्मिक क्षेत्र आहेत त्या धार्मिक क्षेत्रासाठी वेगवेगळ्या राज्यातून येणाऱ्या लोकांसाठी पर्यटन क्षेत्राकडे वळवण्यासाठी मदत होणार आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *