महाराष्ट्र राज्य भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा पदी आमच्या भगिनी सोलापूर जिल्हा महिला रणरागिणी रश्मी (दिदि) बागल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले..
एव्हडे मी भोगिले की मज हसावे लागले..
संघर्ष हा लडवतो, रडवतो, हरवतो आणि शेवटी आयुष्य घडवतो आणि घडल्यानंतर ऐकायला प्रत्येकाला आवडतो हेच जीवनातील रहस्य संयमाला शस्त्र बनवून संघर्षातून यशाकडे नेत होय मी बोलतोय अशाच एका भिन्न विचारांच्या आपल्या हक्काच्या माणसाबद्दल व्यक्तीबद्दल अर्थात रश्मी दिगंबरावजी बागल…..
डोळ्यासमोर लहान वयात बाप नावाची चादर त्यांच्या आयुष्यातून आता निघून गेली होती त्यामुळे उजाडलेली प्रत्येक सकाळ “रश्मी (दिदि) बागल” यांना जबाबदारीची जाणीव करून देत होती आणि अशावेळी विरोधक आपला डाव साधत होते हाथी चले अपनी चाल कुत्ते भोंकें एक हजार” या म्हणीचा प्रत्यय बागल गटाला पदोपदी येत होता आणि येत आहेत या सगळ्या भावनिक कडेलोटातून ती सावरली आणि आपल्या मार्गावर पुन्हा चालत राहिली ज्याच्या विचारांना अनेक वेळा विरोधच झाला, याचं मनोबल ढासळण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, विरोधकांनी याला खाली खेचलं, वेडेवाकडे बोल लावले; पण पण ती रणरागिणी हारली नाही, खचली नाही, मार्गात किती तरी काटे आले पण त्या काट्यांमधून मार्ग काढत ती, फक्त पुढे चालत राहिली आणि पुढे चालत आहे…
वडीलांनंतर ( दिगंबरावजी मामांनंतर) सदैव जनतेच्या हिताचं काम करत राहणं” ही आपल्या आईची( शामल मामींची) शिकवण लक्षात ठेवून रश्मी दिदि आणि दिग्विजय भैय्या यांची वाटचाल चालु आहे आपल्याच स्वप्नांना डोळ्यादेखत दूर जाताना पाहणं आणि प्रत्येक वेळी संयमाचा मंत्र जपणे एवढं सोपे नाही, पण संघर्षातून स्वप्न पूर्ण करणार हिच वाटचाल करत पूढे काट्याटुट्यातून रक्ताळलेले पाय घेऊन सध्या बागल कुटुंबासोबत हा बारा-बलुते आठरापगड जातींनी बनवलेला बागल गट आजही सर्वाना सोबत घेऊन चालत आहे…
म्हणतात ना जो संघर्ष करतो देव त्याचीच परीक्षा बघतो संकटामागुन संकटे येत असताना माझ्या शेतक-यांनी पुर्ण विश्वास ठेवून मकाई कारखान्याला ऊस घातला त्यांची देणे देण्यासाठी विविध बँकांचे हेलपाटे माराताना हि जनता पहात होती पण एकिकडे बागल यांना विरोध म्हणून त्यात अडचणी निर्माण करण्याचे काहिंनी विडा घेतलाय हा विरोध फक्त बागल यांना नाही तर शेतकरी बांधवांच्या पैसाला होत होता हे त्यांना माहिती असताना राजकीय पोळी भाजून काढण्याचे काम मध्यंतरी विरोधकांनी केले पण त्यांचे मनसूभे उधळून लावून शासनदरबारी पाठपुरावा करून पैसे जमा केले आणि एक वर्ष माझा शेतकरी राजा ज्याने विस्वास ठेवला त्याचे देणी दिली कारण शेतक-यांची देणी देणं कर्तव्य जबाबदारी होती हि जाण रश्मी दिंदि ना होती आणि ती पुर्ण झाली पुन्हा त्याच ताकतीने हि रणरागिणी मैदानात उतरली आता बागल गटावर जाणूनबूजून टिका करणा-या लोकांची खैर नाही समजताच काहिंनी आपला ताथा गुंडाळला असो आजचा विषय राजकीय नाही त्यामुळे मी जास्त बोलणार नाही त्या गोष्टींवर…
उच्चशिक्षित; हुशार; अभ्यासू आणि जबरदस्त सहनशीलता याच एकत्रित रसायन म्हणजे रश्मी दिदी” आज जरी संघर्षाच्या वाटेवरून जात असल्यातरी उद्याच्या भविष्यात नोंदीत ‘दिदींच्या कार्याची दखल सुवर्णक्षरांनी घेतली जाईल यात कोणतीही शंका वाटत नाहीये आपले नेतृत्व पुन्हांदा बहरत जावो ही आमची रणरागिणी कधीच दमू देऊ नको, कधीच मागे सरु देऊ नको. ज्या ज्या वेळी मैदानात उतरेल त्या त्या वेळी विरोधकांला मैदानाची धूळ चारू दे. या महिला रणरागिणी ला कायम लोकहिताचे राजकारण करु दीदी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…
शुभेच्छुक: युवा “D” ग्रुप