करमाळा प्रतिनिधी

जिल्हाधिकारी यांना दिले बहुजन संघर्ष सेनेने निवेदन भीमा नदीमध्ये कुगाव येथे नाव उलटून मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांना व रायगाव येथे वीज पडून मृत्यू झालेल्या एक जणाला प्रत्येकी शासनाने दहा लाख रुपये मदत करावी. त्याचप्रमाणे

वादळात करमाळा तालुक्यातील केळी बागा व इतर फळबागांचे नुकसान झालेले पंचनामे करून त्वरित मदत द्यावी. तसेच वादळाने घरांची पडझड झालेली व पत्रे उडून गेलेल्या लोकांचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी.

पुढील काळामध्ये करमाळा तालुक्यातील लोकांना इंदापूरला जाण्यासाठी भीमा नदीमध्ये ज्या बोट आहेत त्यांना कायदेशीर परवानगी असल्याशिवाय प्रवासी वाहतूक करू देऊ नये ही सर्व जबाबदारी प्रशासनाची आहे. आजपर्यंत अनाधिकृत रित्या बोटी

मधून प्रवाशांची वाहतूक होत होती याच्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले होते म्हणूनच कुगाव येथे नाव उलटण्याची दुर्घटना घडली. यापुढे अशी दुर्घटना घडू नये याची सर्व काळजी प्रशासनाने घ्यावी. तसेच करमाळा तालुक्यातील सर्व नुकसानीचे

पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची रक्कम द्यावी अशी मागणी बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम व बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अण्णा सुपनवर यांनी केली आहे. निवेदन नायब तहसीलदार माजिद काजी यांनी स्वीकारले. यावेळी उपस्थित रमेश भगवान भोसले, संतोष चव्हाण, राजेंद्र शितोळे, काका काकडे, अण्णासाहेब शिंदे, शेख आदी जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *