करमाळा प्रतिनिधी

राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त करमाळा येथे राष्ट्रीय समाज पक्ष व सकल धनगर समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक ३१/५/२०२४ वार शुक्रवार रोजी सकाळी ९:३० वा. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन होईल. नंतर सकाळी १०:३० वा. रक्तदान शिबिर व शरबत वाटप चा कार्यक्रम सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत चालू असेल. दिनांक १/६/२०२४ वार- शनिवार रोजी

सकाळी – १०.०० वा. कुटीर रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दिनांक १/६/२०२४ वार-शनिवार रोजी दुपारी-३:००वा. पांजरपोळा गोशाळा येथे मुक्या जनावरांसाठी ओला चारा वाटप करण्यात येणार आहे.

दिनांक १/६/२०२४ वार- शनिवार रोजी सायंकाळी-५:००वा. मदरशा उर्दू शाळेत खाऊ वाटप ठिकाण नालबंद मंगल कार्यालय येथे होणार आहे. दिनांक-२/६/२०२४ वार रविवार सकाळी ९:३० वा. वृक्षारोपण व पाणपोई उद्घाटन ठिकाण- राजमाता भवन बायपास,निलज रोड येथे होईल. दिनांक २/६/२०२४ वार रविवार सायंकाळी-५:००वा. करीअर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान व करीअर मार्गदर्शन ठिकाण:-राजमाता भवन बायपास निलज रोड..‌ संपर्क:- ९९२१५८७४८२, ९९६०६९०७६९, ९५०३५४२८६५

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *