
करमाळा प्रतिनिधी
इंदापूर व करमाळा तालुक्यातील नागरिकांना (४ किमीवर) हाकेच्या अंतरावरील असलेल्या गावात जाण्यासाठी भिगवण टेंभुर्णी मार्गे वळसा मारुन रस्त्याच्या मार्गे ९० ते १०० किमी प्रवास करावा लागतो. त्यामुळे अधिकचा वेळ व वेळेची बचत करण्यासाठी प्रवाशांना उजनी जलाशयातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. त्यामुळे आगोती (ता.इंदापूर) ते गोयेगाव (वाशिंबे) (ता. करमाळा) दरम्यान पुल बांधण्यायाची गरज आहे.

उजनी धरणाच्या निर्मितीनंतर या भागात केळी, डाळींब, ऊस व इतर फळबागांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे हा परिसर फुट व शुगर बेल्ट म्हणून ओळखला जातो. तसेच उजनी जलाशयावर देशी विदेशी पक्षी हजेरी लावत असल्याने पक्षीप्रेमी मोठ्या प्रमाणात या परिसरात येत असतात त्यामुळे येथील कृषि पर्यटन, मासेमारी, साखर उद्योग, वनस्पती

अभ्यास, नौकाविहार, जलपर्यटन यांना चालना देण्यासाठी गोयेगाव (वाशिंबे) ते आगोती दरम्यान भीमा नदीवर पूल बांधण्याची गरज आहे.उजनी धरण होण्यापूर्वी येथील नदी पात्रातून बैलगाडी द्वारे वाहतूक होत असे. सध्या याठिकाणी बोटीतून वाहतूक सुरू आहे. आगोती ते गोयेगाव भीमा नदीचे अंतर कमी असून दोन्ही किनाऱ्या पर्यंत रस्ते उपलब्ध आहेत. त्यामुळे जमीन संपादनाची आवश्यकता नाही. दोन्ही बाजुकडुन तीनशे तीनशे मीटर पर्यंतचे भराव आणि मुख्य नदी पात्रात पूल झाल्यास येथील विकासाला निश्चित चालना मिळेल असे मत परिसरातील नागरीकांकडून व्यक्त होत आहे.

……………
इंदापूर व करमाळा तालुक्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी उजनी जलाशयात आगोती ते गोयेगाव (वाशिंबे) असा पूल होणे आवश्यक आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील वीस ते पंचवीस गावांना याचा फायदा होणार आहे. तसेच इंदापूर तालुक्यातील बाजार पेठेवर ही या पूलाचा सकारात्मक होणार आहे. शासनस्तरावर या पूलासाठी पाठपुरावा करनार आहे – निलेश देवकर, कळाशी (जिल्हा अध्यक्ष रयत क्रांती संघटना पुणे)
