
करमाळा प्रतिनिधी
दत्तकला आयडियल स्कूल अॅन्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं. १ चा इयत्ता १२ वी चा निकाल सलग ९ वर्षे १०० टक्के लागला आहे. १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे असे संस्थापक संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ सर यांनी सागितले.

प्रशालेचे यशवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे – सोनवलकर शर्वरी विठ्ठल:- ८३.००%, तांबोळी सानिया जाफर:- ८२.६७%, चौधरी यशराज गोरख:- ८२.५०%.
प्रशालेचे तब्बल २६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ३३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत.

या यशासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शना बरोबर दर महिन्याला टेस्ट सिरीज,सिईटीचे मार्गदर्शन, गेस्ट लेक्चर, क्षेत्र भेट, पेपर संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. या कॉलेज मध्ये 200 मार्काचा क्रॉप सायन्स विषय असून बोर्ड परीक्षेमध्ये 19 विद्यार्थांना 190 पेक्षा जास्त मार्क मिळाले आहेत अशी माहिती प्राचार्य विजय मारकड सरांनी दिली. त्यापैकी पाटील प्रगती प्रवीण (१९४ मार्क), पवार महेश दत्तात्रय (१९३ मार्क), गिरिगोसवी ऋतुजा सिद्धेश्वर (१९२ मार्क).

या यशाबद्दल पालक वर्गातून आनंद आणि कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ सर, उपाध्यक्ष राणादादा सुर्यवंशी, सचिवा माया झोळ मॅडम, स्कूल डायरेक्ट नंदा ताटे मॅडम, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर सर, स्कूलचे प्राचार्य विजय मारकड सर, प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.