करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका एज्यूकेशन सोसायटी संचलीत महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांनी या वर्षी देखील तालुक्यात इ. १२ वी बोर्ड परीक्षेत निकालात सर्वाधिक ३२२ विद्यार्थी बसलेले असताना देखील तब्बल ३२१ विद्यार्थी

उत्तीर्ण होवून ९९.६८% निकाल लागला आहे. नमिरा इनुस फकीर हीने ९२.१७% गुण मिळवत तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच साक्षी गणेश देशमाने हीने ८९.६७% गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला असून तन्वी रविंद्र अडसूळ

या विद्यार्थीनीने ८८.५०% मार्क्स मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. एकुण ३२२ विद्यार्थ्यांपैकी ४१ विद्यार्थी विशेष प्राविण्याह प्रथम श्रेणीत, १८४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ०२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी मिळवत

पास झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षक शिक्षिकांचे संस्थेचे अध्यक्ष मा. आ. जयवंतराव जगताप, विश्वस्त माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, विश्वस्त माजी उपनगराध्यक्ष नारायणबापू जगताप, विश्वस्त युवा नेते शंभूराजे जगताप, प्राचार्य पी. ए. कापले, उपप्राचार्य अनिस बागवान, पर्यवेक्षक पाटील बी. के., पर्यवेक्षिका सुनिता नवले, विज्ञान शाखा विभाग प्रमुख पवार व्ही. एल. यांनी अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *