
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगर परिषदेतील पाणी पुरवठा विभाग यांना वारंवार तक्रारी देऊन एक वर्षांपूर्वी धरणे आंदोलन करुन करमाळा शहरातील विविध विभागातील पाणीपुरवठा होत नाही. पाणी पुरवठा अधिकारी, कर्मचारी यांना तक्रार करुन देखील काही फरक पडत नाही. यापूर्वी सुद्धा जिल्ह्यावर भयानक दुष्काळाचे सावट पडलेले होते. त्यावेळी पाण्याचे योग्य नियोजन होत होते. मात्र

सध्या प्रशासक नेमणूक असल्याने करमाळा शहरातील महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शहरातील प्रत्येक घराणे हे श्रीमंत नाहीत. त्यांना पाणी विकत घ्यावे लागते त्याकरिता त्यांना रु.1000 ते 2000 पर्यंत पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागतो. ते घेण्याकरिता देखील काम-धंदे, आर्थिक रोजंदारी सोडून पाण्याच्या मागे धावावे लागत आहे. याबाबत

कर्मचारी बघ्याची भूमिका घेत आहेत. पाण्याबाबत विचारणा केल्यास पाईपलाईन दुरुस्ती करावयाची आहे, ती खराब झाली आहे, ती बदलावी लागेल, बदलण्याकरिता पुरेसा निधी नाही अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळतात. या गोष्टीला सर्वस्वी जबाबदार अधिकारी व कर्मचारी वर्गच आहे. पाणी पुरवठा 4 ते 5 दिवसांतून एकदा होतो. त्यातही सर्व कामे बाजूला सारुन पिण्यासाठी वणवण करावे लागते. यामुळे करमाळ्यातील परिस्थिती पण्यासाठी बिकट होत आहे. करमाळा आणि पाण्यावाचून तरमळा अशी गत झाली आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सध्या आहे.

त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडी एक हात मदतीचा म्हणून करमाळा नगर परिषदेसाठी आर्धिक निधी उपलब्ध करण्याकरिता भीक मांगो आंदोलन करुन करमाळा नगर परिषदेस आर्थिक हातभार लावण्यासाठी ये त्या शुक्रवारी दि. 24.05.2024 रोजी करमाळा शहरात भीक मागून आंदोलन करणार आहे. असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी दिला आहे. निवेदन मुख्याधिकारी करमाळा, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष गणेश कांबळे, तालुका संघटक महावीर पोळ, ता.उपाध्यक्ष संभाजी कांबळे, तालुका संघटक तुकाराम घोंगडे, शहर उपाध्यक्ष, साधू चौथमहाल, राहुल कांबळे, अक्षय ससाणे, कालिदास पवार. चंद्रकांत साळवे, राहुल दामोदरे, दादा आरणे, राहुल सरवदे, चंद्रकांत पवार, जय कांबळे, तेजस धेंडे, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.