
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात दुष्काळ परिस्थितीमुळे शेती बरोरबरचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. शासनाकडून काही भागात टँकर सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी ती तुटपुंजी आहे म्हणूनच प्रा. रामदास झोळ सर फाऊंडेशनने

नेहमीप्रमाणे सामान्य जनतेच्या मदतीला धावून येवून तालुक्यातील नागरिकांना मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवून त्यांची खऱ्या अर्थाने तहान भागवण्याचे काम केले आहे. मागेल त्या गावाला पिण्याच्या पाण्याचा टँकर देण्याची भूमिका

प्रा.रामदास झोळ सरांनी फाऊंडेशन च्या माध्यमातून घेवून टँकरच्या बाबतची मागणी थेट सरांच्या कडे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राजकारणा बरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या सरांच्या भूमिकेचे तालुक्यातील नागरिकांकडून उस्फुर्त स्वागत करण्यात येत आहे.

राजुरी, देवळाली, करमाळा शहर, भोसे, रंभापुरा या भागात टँकर च्या माध्यमातून पाणीपुरवठा होत असून तालुक्यातील अन्य भागात देखील मागणी येईल तसे टँकर पुरवले जातील असा विश्वास झोळ सरांच्या वतीने देण्यात आला आहे.