सोलापूर दि.03 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान  बरगढ (ओडीशा) संस्था येथील हातमाग व वस्त्र उद्योग तंत्रविज्ञान पदविका या तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी 10 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग आयुक्त आयुष्यांत पंडा यांनी दिली

           भारतीय तंत्रज्ञान संस्था बरगढ (ओडिशा ) येथे प्रथम वर्षासाठी महाराष्ट्र राज्यातून 13 जागा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील एका जागेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे तसेच व्यंकटगिरी येते दोन जागेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. द्वितीय वर्षासाठी तीन जागा असून त्यापैकी एक जागा आर्थिक दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याअनुषंगाने इच्छुक उमेदावारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज दिनांक. 10 जून 2024 पर्यंत संबधित प्रादेशिक उपआयुक्त, वस्रोद्योग कार्यालय यांचेकडे सादर करावेत.

        प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईट http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमूना सर्व प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असेही  अविष्यांत पंडा यांनी कळविले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *